मर्डर वेपन - प्रकरण 3

  • 6.1k
  • 3.7k

मर्डर वेपन प्रकरण ३ “ एक मिनिट, तुला नक्की पोलिसांना बोलवायचं आहे?” पाणिनीनं विचारलं “ का नाही बोलवायचं? तुम्ही....” ती ओरडली. “ तू माझ्या ऑफिसात तुझी हँड बॅग विसरून आलीस त्यात अशा काही वस्तू होत्या की पोलिसांनी त्या पहिल्या तर तू अडचणीत येऊ शकतेस. त्या तुझ्या असोत किंवा नसोत, तुला त्याचा खुलासा पोलिसांना द्यावाच लागेल.” तिने फोन खाली ठेवला. पाणिनी पटवर्धन ने तो उचलून पुन्हा तिच्या हातात दिला. “ कर फोन.” तो म्हणाला. ती अडखळली. “ तुम्ही सर्व काही संग मला.” ती म्हणाली. “ सुरुवात तुम्ही करायला हवी,मिसेस रायबागी.तुम्ही माझ्या ऑफिसातून मला न भेटता निघून जाणे, किल्ल्या, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि