ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 13

  • 5k
  • 1
  • 2.8k

प्रकरण १३ पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसात काया बसली होती. “ किती वेळ हातात आहे आपल्या? ” तिने विचारले. “ नाही सांगता येणार.,तुझ्या वडलाना अटक झाल्ये का आणि झाली असेल तर त्यांनी काय सांगितलंय पोलिसांना यावर ते अवलंबून आहे.”पाणिनी म्हणाला. “ मला नाही वाटत त्यांना अटक करण्या एवढे त्यांचेकडे काही आहे म्हणून ” काया म्हणाली. “ मला अत्ता सर्व काही सांगून टाक गोल गप्पा मारण्य पेक्षा.”पाणिनी म्हणाला. “ मी सर्व सांगितलं तर तुम्ही आमची वकिली घेणार नाही. ”काया म्हणाली “ मूर्खासारखे बोलू नको. या घडीला मी मागे घेऊ शकत नाही. तू स्वत: बरोबर सौम्या ला सुद्धा यात गुंतवल आहेस.” पाणिनी म्हणाला.