कुलवधु लपवी अवयव

  • 6.1k
  • 2.5k

अर्थ:- कुलीन घराण्यातील वधू चा कल नेहमी शरीर झाकण्याकडे असतो. त्यावर आधारित कथा:- "अरे! काय झालं निशा! अशी चिडलेली का दिसतेस तू?",निशाची आई " नचिकेत कुठेय? आला का नाही घरात तो?",निशाचे बाबा म्हणाले. "तो आता येणार नाही आणि मीसुद्धा ठरवलंय की त्याच्याशी लग्न करायचं नाही म्हणून",निशा "अरे अरे! हे काय विपरीत! लग्न ठरल्या पासून ही चार पाच वेळा भेट झाली तुमची आणि हे काय विपरीत! ",निशाची आई "अगं तो खूप बॅकवर्ड विचारांचा आहे",निशा "म्हणजे लग्न झाल्यावर माहेर विसरायचं असं म्हणाला का तो?",निशाचे बाबा निशाने नकारार्थी मान हलवली. "मग स्त्री ही पुरुषाची दासी आहे असं काही म्हंटल का त्याने?",निशाची आई "नाही