मर्डर मिस्ट्री

  • 12.6k
  • 1
  • 4.8k

"हॅलो गुप्तहेर केशव देशमुख?""हो बोलतोय""त्वरित पोलीस स्टेशन ला या अत्यंत महत्वाची केस आहे."मला इन्स्पेक्टर नाईकांनी बोलावलं. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर,"दिल्लीतले केंद्र मंत्री पी. व्ही. सिन्हा यांची मुलगी निशा लंडन जवळच्या नॉटिंगहॅम गावात एका युनिव्हर्सिटीत शिकत आहे आणि जवळच्याच स्टुडंट हॉस्टेल मध्ये ती राहते. तिच्यावर तिच्याच मैत्रिणीच्या खुनाचा आरोप आला आहे आणि त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे की तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतेय पण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत. आता पी. व्ही. सिन्हा यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात गुप्तहेर केशव देशमुखच काहीतरी करू शकतील. या आधी अनेक गहन प्रकरणे तुम्ही सोडविल्यामुळे त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी नॉटिंगहॅम पोलिसांना अर्ज करून