मर्डर वेपन - प्रकरण 1

  • 13.6k
  • 8.5k

मर्डर वेपन प्रकरण १ “आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसल्ये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ तिचं म्हणणं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवाय तिला.जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत.” “ कोण आहे ती? आणि कुठे आहे अत्ता?” पाणिनीनं विचारलं “ तिचं नाव आहे रती रायबागी, पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे.” –सौंम्या पाणिनीने आश्चर्याने भुवया उंचावल्या. “ मी साडेबाराला जेवायला बाहेर गेले, जातांना आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला सांगून गेले होते.मी बाहेर पडले आणि पाच दहा मिनिटात ही बया आली म्हणे.खूप चिडून आली होती.गतीला म्हणाली कि कोणत्याही स्थितीत तिला पाणिनी