ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 9

  • 5.4k
  • 3k

प्रकरण 9 पाणिनी व सौम्या बाहेर पडले. “ मी तुला तुझ्या घरी सोडतोय.आणि तू निमूटपणे झोपणार आहेस.”पाणिनी म्हणाला. “ वेडेपणा करू नका सर. मला तो गर्ग आवडलाय.त्याचं बोलणं ऐकत रहावं अस होत. तुम्ही ती पत्र कधी वाचणार आहात ?” सौम्याने विचारलं “ उद्या ऑफिस ला आल्यावर, अर्थात ! ” “ छे ! एवढा धीर कुणाला आहे इथे? आपण आपल्या गाडीत बसून गाडीतील दिव्यातच वाचून काढू.” सौम्याम्हणाली. त्या दोघांनी ती सर्व पत्रे वाचून काढली.साहसचे आडनाव बेलवलकर होते., सात आठ पत्र होती.मागच्या दीड-दोन महिन्यातच हा पत्र व्यवहार झाला होता.प्रत्येक पत्रात दोघांतील जवळीक वाढत गेल्याचे लक्षात येत होते. “ चांगला वाटतोय पोरगा.” सौम्याम्हणाली.