पुन्हा नव्याने - 9

  • 5.4k
  • 1
  • 3k

भाग ९ मावशी मीराच्या केसांना मनापासून तेल लावत होत्या. मीराला तिच्या आईची आठवण आली." माझी आई पण माझ्या केसांना असचं तेल लावून द्यायची. " मीरा मावशी ला म्हणाली. राजीव साठी तिने आई बाबांना दुखावले होते याची तिला खंत वाटत होती. मावशी, " आई ती आईच असते तिच्या मायेची सर कशालाच नसते. तिच्या इतकी माया आपल्या वर कुणी च करत नाही. " मीरा, " मावशी तुम्हाला एक विचारू रागवणार नाही ना? " मावशी, "अहो ताई, असं कायं बोलताय तुमच्या वर मी कशाला रागवेन.? तुम्ही माझ्या अन्नदाता आहात. * मीरा, " तुम्ही जेव्हा माझ्या घरी आलात तेव्हा मी सांगितलेल्या अटी तुम्ही लगेच