किस्से चोरीचे - भाग 7

  • 4.4k
  • 2.2k

किस्से चोरीचे अगदी दोन हजार चार सालापर्यंत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल सेवा पोहोचलेली नव्हती.शहरांत खाजगी कंपन्यानी मोबाईल सेवा देणे सुरु केले असले तरी ती खूप महागडी होती.ग्रामीण भागात त्यावेळी लँडलाईन हेच मुख्य संपर्कसाधन उपलब्ध होते.आमच्या खात्याच्या टेलिफोन लाईन्स मुख्यत्वे जमिनीखालून टाकलेल्या केबल्सवर चालायच्या. या केबल्समधील वाहक तारा या किमती तांब्याच्या असायच्या त्यामुळे आमच्या खात्याला कायमच केबल चोरांचा उपद्रव व्हायचा. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अशा अनेक केबल चोरीच्या नियमितपणे घटना घडत असत. एकदा का एखाद्या विभागात अशी केबल चोरीची घटना घडली की त्या विभागाच्या अधिकाऱ्याला खूपच डोकेदुखी व्हायची.केबल चोरी झाल्यावर त्या केबलवर चालणारे सगळे टेलिफोन बंद व्हायचे.टेलिफोन ग्राहकांच्या तक्रारीना