लेबल

  • 4.8k
  • 1.8k

लेबल. माझ लग्न ठरलं,लग्नपत्रिका छापून आल्या. निमंत्रण करायला सुरूवात करायची होती.मी असा विचार केला की ज्या वस्तीत राहून आपण शिकलो, नोकरी मिळवली, जेथे आपण इतके दिवस रहातोय तेथील प्रतिष्ठीत व्यक्तींना आपण सर्वप्रथम निमंत्रण पत्रिका देवू या! वस्तीत आमच्या छत्रपती शिवाजी मंडळाने साईबाबा मंदिर बांधले होते. या साईं मंदिराचा मी अगदी सुरूवातीपासून क्रियाशील सदस्य होतो. तर सर्वप्रथम मी बाबांच्या मुर्तीसमोर लग्नपत्रिका ठेवली. साईबाबाना मनोभावे नमस्कार करून हे कार्य सुरळीतपणे पार पडावे अशी प्रार्थना केली. पत्रिका देण्यासाठी पहीली व्यक्ती निवडली- गाडे वकील! या वकील साहेबांचे आणि माझी केवळ तोंड ओळख होती, कधी समोरासमोर बोलणे झाले नव्हते. मला ते मंदिराच्या चौकात मित्रांबरोबर उभा