किस्से चोरीचे - भाग 5

  • 4.4k
  • 2k

किस्से चोरीचे आम्ही पती पत्नी नोकरी करत असूनही बरीच वर्षे घरातल्या कामासाठी कोणी मोलकरीण ठेवलेली नव्हती. खरे तर घरची कामे आणि नोकरीची धावपळ यात आमची दोघांचीही खूप दमछाक व्हायची;पण सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्टया परवडत नव्हते म्हणून आणि पुढे स्थिरता येऊनही घरकामासाठी मोलकरीण ठेवणे फारसे मनावर घेतले नव्हते. याचे कारण म्हणजे आमच्या वेळेत घरी येऊन काम करू शकणारी कामवाली मिळवणे सोपे नव्हते.शिवाय आमच्या गैर हजेरीत कुणा अनोळखी कामवालीवर घर सोपवणे आमच्या दोघांच्याही मनाला पटत नव्हते. माझ्या मुलाचे लग्न झाल्यावर मात्र वाढलेली घरातली कामे उरकणे आवाक्यबाहेर वाटल्याने आमच्या शेजारच्या वस्तीतली एक मावशी,(आम्ही घरात सगळे त्यांना ताई म्हणायचो) स्वयंपाक आणि साफ सफाईसाठी ठेवल्या.