सूत्रधार - भाग ४

  • 6.1k
  • 3.3k

"आमदार धनंजय देसाई यांची त्यांच्याच फार्म हाऊस मध्ये झालेली हत्या, त्यानंतर राज्याचे पर्यावरण व विकास मंत्री विलासराव सावंत यांच्यावर भर प्रचार सभेत झालेला जीवघेणा हल्ला, आणि या हल्ल्यानंतरच्या अवघ्या काहीच तासांमध्ये ' जनशक्ति पक्षकार ' आप्पासाहेब गडकरी यांच्या नाट्यमय हत्येने राज्य हादरून गेलंय,आणि विशेष म्हणजे हल्लेखोराने आज आप्पासाहेब गडकरींच्या हत्येअगोदर याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजतीये ,त्यामुळें ' जनता खरंच पोलिसांच्या जीवावर सुरक्षित आहे का? ' असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जातोय..." टीव्ही वर सुरू असलेल्या बातम्या शिव भावनाशून्य नजरेने पाहत होता."अहो! अजून किती वेळ असं स्वतःला दोष देत बसणार आहात?" वैदही शिव च्या शेजारी बसत म्हणाली