सूत्रधार - भाग ३

  • 5.7k
  • 3.3k

"नाही फार कही सीरियस नाहीये,फक्त थोडा मूका मार लागलाय आणि थोडं खरचटलंय त्यांना..." डॉक्टरांचा आवाज त्याच्या कानावर पडत होता.शिव ने हळूवार डोळे उघडले.पहिल्याच क्षणी ठणकणारं शरीर आणि मऊ हाताचा स्पर्श त्याला जाणवला."अहो..."वैदही त्याचा हात अजूनच घट्ट पकडत म्हणाली.तिच्या लाल झालेल्या डोळ्यातून गालावरून ओघळणारे तिचे अश्रू नजाणो किती वेळापासून बेडवर पडत होते.शिव मात्र अजून भानावर आलाच न्हवता पुन्हा तेच दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळलं , बाईकखाली निपचित पडलेला रक्ताने माखलेला अनिश....एखादा विजेचा झटका बसावा त्या प्रमाणे शिव भानावर आला."अनिश...अनिश कुठे आहे...? कसा आहे तो..? मला त्याला भेटायचंय..."शिव ताडकन उठत बोलला,इतक्यात त्याच्या पाठीतून एक जोरदार सनक गेली."आईगं..." तो कळवळला."अहो..,झोपा बरं आधी."वैदही शिवला आधार