पुन्हा नव्याने - 5

  • 5.7k
  • 1
  • 3.3k

भाग ५ राजीव, " मीरा आता बस झालं. या गोष्टी साठी मी तुझी खूप दा माफी मागितली आहे. " मीरा, " राजीव साहेब खूप उपकार झाले तुमचे की, तुम्ही माफी मागितली. पण फॉरमॅलिटी म्हणून. तुला पश्चात्ताप झालेला दिसत नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. आता मी जे ठरवलं आहे ते मी करणारच. " राजीव विचार करू लागला. कसं बरं हिला सयजवाव. राजीव ने मग खर्चाचा विषय काढायच ठरवले. कारण जास्ती चा खर्च नको म्हणून मीरा ने आजपर्यंत कधी कामवाली बाई नाही ठेवली. त्याने खर्चाचा विषय दाखवून तिचं काम करण थांबवायचे ठरवले. राजीव, " मीरा पूर्ण वेळ कामवाली म्हणजे तिचा पगार