सख्या रे - भाग 5

  • 5.8k
  • 3.4k

भाग – ५संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती. मितालीचा परिपूर्ण लक्षात होते कि तिला ऑफिस नंतर बागेत जायचे आहे, कारण सुमित तिची बागेत वाट पाहणार आहे म्हणून. तर मिताली तिचा सीटवरून उठली आणि तिने थेट सुमितचा केबिनकडे नजर वळवली. तर तिला तेथे काहीच हलचल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसचा बाहेर निघतांना मुद्दामून सुमितचा कॅबीन जवळून आली. काय बघते तर सुमित आधीच निघून गेलेला होता. मिताली हि आता लगबगीने ऑफिसचा बाहेर निघाली. तिचा बरोबरचा मित्र मैत्रिणी तिला बस स्टँड जवळ चालण्यास म्हणू लागले. तर मितालीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली.