ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 4

  • 6.3k
  • 4k

प्रकरण चार बाहेर आल्यावर पाणिनी ने सौम्या ला फोन लावला. “ जेवलीस का सौम्या ?” “ नाही,नाही.तुम्ही मला थांबायला सांगितलं होत ना?” “ मी जेवायलाच गेलो होतो.” पाणिनीम्हणाला. “ हे बर आहे तुमचं.मला थांबायला........” “ आणि जेवणा ऐवजी खून सामोरा आला.”पाणिनीम्हणाला. “ कोणाचा खून झाला?” “ पद्मनाभ पुंड ”“ अरे देवा ! ” सौम्याउद्गारली.“ असं कसं काय झालं पण? ” “ काय माहिती ? झालं खर ” पाणिनीम्हणाला “ आपलं अशील कोण आहे? ” “ कोणीच नाही. अशिला शिवाय आपण खुनाचा खटला घेऊ शकत नाही का? ” पाणिनीने विचारले. “ बहुतेक नाही घेऊ शकत.” सौम्याउत्तरली. “ कनकला वर्तमान पत्र वाल्यांकडे