निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ५

  • 4.4k
  • 2.3k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ५मागच्या भागात आपण बघीतलं की माधवीशीपंकजचे बाबा दत्तक या विषयावर बोलतात.आता माधवी काय निर्णय घेते बघूमाधवी गेले आठ दिवस बाबांनी सुचवलेल्या दत्तक या पर्यायाचा विचार करत होती. तिच्या मनात प्रचंड घालमेल चालू होती. विषय इतका नाजूक आहे की त्यावर कोणाशी मनमोकळेपणाने बोलावं तिला कळत नव्हतं. स्वतःच्या आईबाबांशी कसं बोलावं हेही तिला उमगत नव्हतं.पंकज माधवीची घालमेल बघत होता पण मुद्दामच काही विचारत नव्हता. त्याच्या बाबांनी त्याला सांगीतलं होतं की हा निर्णय माधवीलाच घेऊ दे. तिच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत तू हा विषय तिच्यासमोर काढू नकोस. खूप नाजूक विषय आहे आणि यावर निर्णय घेणं कठीण आहे तो तिला