सूत्रधार - भाग १

  • 9k
  • 4.4k

"बाबा...! बाबा...अहो उठा ना...बघा किती वाजलेत? आज तुम्ही मला बागेत जायचं म्हणून प्रॉमिस केलेलं ना..? मग उठा ना." लहानशी चिऊ तिच्या झोपलेल्या बाबांना उठवत होती."चिऊ, उठ बरं तिथून बाबांना त्रास नको देऊ, ते काल रात्री उशिरा दमून आलेत झोपू दे त्यांना. चल बरं पटकन,मी तुला अंघोळ घालते."वैदही आपले केस पुसत म्हणाली."नाही... मी नाही येणार, अगं मला बाबांनी काल प्रॉमिस केलंय..." "काय चाललंय सकाळी सकाळी तुम्हा दोघींचं?"वैदही काही बोलणार इतक्यात शिव डोळे चोळत उठून बसला."Good Morning बाबा..." चिऊ पटकन शिव च्या मिठीत शिरली."Good Morning पिल्लू.." शिव तिला कुशीत घेत बोलला."बघा ना बाबा तुमची बायको मला कशी बोलतिये सकाळी सकाळी." चिऊ शिव