शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग ३

  • 3.9k
  • 1.4k

भाग ३."पृथा, तुला आठवत आपल बालपण? एवढे भयंकर आपण भांडायचो? की लोक देखील म्हणायचे, कसे होईल यांचे?", प्रलय तिच्या शेजारी बसत म्हणाला.ती आज गॅलरीत बसून आपल त्याच्यासोबत वेळ घालवत होती. "हो. आठवत ना! तेव्हा आपण भांडत असायचो. पण आता एकमेकांशिवाय करमत नाही आपल्याला", पृथा त्याच्या मांडीवर जाऊन बसत त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली."वेगळे होते ते दिवस.", प्रलय तिला जवळ घेत म्हणाला. पृथा हसून डोळे बंद करते आणि भूतकाळात हरवते. तो देखील तिला जवळ घेऊन भूतकाळात जातो.भूतकाळ:-आंबोली, महाराष्ट्र आंबोलीच्या एका छोट्याश्या गावात एक तेरा चौदा वर्षांच्या आसपास असलेली मुलगी सायकलवर बसून हातवारे करत काहीतरी बोलत असते."या वर्षी टोटल चाळीस मार्क्स आणले