शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग २

  • 3.7k
  • 1.7k

भाग २."मी तर सांगितले आहे सगळ्यांना माझा होणारा नवरा इंडियन नेव्ही मध्ये आहे ते. आता तू बघ तुला कधी यायला जमत? माझ्या आई बाबांनी तर परमिशन दिली आहे. पण तुझ्यामुळे सगळ रखडलं आहे.",ती कॉलवर बोलत असते. आताच समुद्राच्या किनाऱ्यावर आलेला तो रेंज मिळाली म्हणून तिला कॉल करतो. पण आता मात्र तिचं बोलणे ऐकून तो "नाही" मध्ये मान हलवतो. "ओके. मी सध्या बिझी आहे. इंडियन नेव्ही मध्ये मी आहे. हे जरी तू सांगत असली तरीही काम काय कमी नसतात. अजून काम संपली नाही माझी!",तो अगदी शांतपणे म्हणाला. "सॉरी सॉरी. मी जास्तच रूडली बोलली राजीव त्याबद्दल. मला तुझी कमी जाणवली. त्यामुळे तो