ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 1

  • 11.7k
  • 7.1k

या कथेतील सर्व पात्रे ठिकाणे आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कथेमधील पात्र प्रसंग घटना यांच्याशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड.......... प्रकरण एक आपल्या ऑफिस चे दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृत धाडकन दार उघडून आत आला. “ कुक्कुटपाल कंपनी चा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली.! ” एका दमात त्याने सांगून टाकले. सुकृत हा एक अत्यंत धसमुसळ्या स्वभावाचा, पुस्तकी किडा पण व्यवहार शून्य असा माणूस होता.पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस चा किरकोळ कार्यभार तो