मी टिंग्या बोलतोय!

  • 9k
  • 3.1k

#मी_टिंग्या_बोलतोय!!©® गीता गरुड. हाय,ए हेलो,असे काय इकडे तिकडे बघताय.जरा इकडे बघा की.मी मी टिंग्या बोलतोय.मला ना आताच मावशीने आंघोळ घातली.ती मला टावेलात लपेटणार इतक्यात मी सुळक्कन पळून इथे दाराआड येऊन लपलो.माझी मम्मा आणि बाबा दोघेही सकाळीच उठून हाफिसात जातात.मम्मा जाताना मला दुधू देऊन जाते.मम्मालाना मला सोडून जाववत नाही. मलापण तिला सोडवत नाही मग मी मम्मा पायजे मम्मा पायजे करुन हातपाय जोरात हलवून रडतो.तेवढ्यात मावशी मला गेलरीत घेऊन जातात. गेलरीत मम्माने खूप छान छान रंगीत फुलं लावलैत, ती दाखवतात.मम्मा हळूच खालून माझ्याकडे बघत असते.मला कळतं ते.पण मी थोडा नमतेपणा घेतो अन् तिला जायला देतो.मावशी मग दुधात कसलीतरी रेडीमेड पावडर मिसळते व