सत्यमेव जयते! - भाग १०

  • 4.8k
  • 2.6k

भाग १०. आज महालक्ष्मीच्या केसचा दिवस होता त्यामुळे राजवीर लवकरच उठला होता. त्याने महालक्ष्मीला मात्र उठवले नव्हते, कारण आता थोडीशी ती उशिरा उठली की , फ्रेश दिसेल या विचारानेच तो तस करतो. स्वतः फ्रेश होऊन आल्यावर तो महालक्ष्मीला उठवतो आणि फ्रेश व्हायला पाठवतो. काहीवेळात महालक्ष्मी फ्रेश होऊन खाली येते. साधासा पंजाबी ड्रेस घातला होता तिने आणि एकदम साधी सिम्पल राहूनच ती खाली येते. मात्र, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स झकळत होता. आज काहीही झालं तरीहि ती घाबरणार नव्हती. अस जणू तिने मनाला सांगितले होते, असे वाटत होतं."महालक्ष्मी, आज काहीही झालं तरीही घाबरायचं नाही आहे तुला. ती लोक विचारतील तसेच उत्तर द्यायचं आहे. ते