सत्यमेव जयते! - भाग ९

  • 5k
  • 2.5k

भाग ९. महालक्ष्मीने सगळ्यांच्या सपोर्टमुळे ही केस लढण्याचा निर्धार केला. राजवीर आणि अपर्णा तिला कशाप्रकारे कोर्ट मध्ये प्रश्न विचारले जातील? उत्तर आपण कशी दिली पाहिजे? हे शिकवत असायचे. कारण विरुद्ध बाजूच्या लोकांचे वकील कसे प्रश्न विचारून ? महालक्ष्मीचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतील. हे , अपर्णा आणि राजवीर जाणून होते. त्यामुळे ते आधीच तिला तसले प्रश्न विचारून तिचा कॉन्फिडन्स कमी न करण्यासाठी प्रयत्न करत होते. महालक्ष्मी पण आता हळूहळू आत्मविश्वासाने बोलत असायची. तिचा आधीचा बोलण्याचा आत्मविश्वास तिच्यात आता परतत होता. केस साठी आणि कोर्ट कचेरी साठी आता ती पूर्णतः तयार झाली होती. उद्या महालक्ष्मीची केस दिल्लीच्या कोर्टमध्ये चालणार होती. आता