सावध - प्रकरण 25 - शेवटचे प्रकरण

  • 5.4k
  • 2.7k

सावधप्रकरण २५कीर्तीकर पिंजऱ्यात येऊन उभा राहिला.“ हिराळकर, दुग्गल आणि तू असे एकत्र व्यवसाय करत होता?”“ नाही ” कीर्तीकर म्हणाला.“ तुम्ही एकमेकांना ओळखत होतात?” पाणिनी म्हणाला.“ हो.”“ तुमची ओळख कुठली?”“ आम्ही एकाच क्लब चे मेंबर आहोत.बऱ्याच वेळा आम्ही संध्याकाळी पत्ते खेळायला एकत्र बसतो. ”“ तुम्ही तिघे स्टोन क्रशिंग च्या आणि बांधकाम व्यवसायात एकत्र भागीदार आहात ही वस्तुस्थिती आहे की नाही?”“ बिलकुल नाही.”“ माझ्याकडे आर्थिक बँकेचे खाते उतारे आणि तुमच्या भागीदारीची कागदपत्रे आहेत.पुरावा म्हणून मी ती कालच कोर्टात सदर केली आहेत.”“ तुम्ही माझीच उलट तपासणी का घेताय पटवर्धन? आदित्य ला दोषी ठरवण्यासाठी तुम्ही माझी साक्ष घेणार होतात ना? ”“ त्याच दिशेने जातोय