सावध - प्रकरण 24

  • 5k
  • 2.8k

सावधप्रकरण २४दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू झालं तेव्हा न्यायाधीश म्हणाले, “ मिस्टर कीर्तीकर ची उलट तपासणी चालू होती काल, ती पुढे चालू करा.”खांडेकर उठून उभे राहिले. “ युअर ऑनर, एक छोटी विनंती आहे, काल कोर्ट संपल्यावर घरी जातांना कीर्तीकर ला छोटासा अपघात झालाय, त्याला मुका मार लागलाय त्यामुळे आज कोर्टात येत येणार नाही त्याला आणि त्याची उलट तपासणी पूर्ण करता येणार नाही.”“ ठीक आहे तुम्हाला आणखी कोणाची साक्ष घ्यायची आहे खांडेकर?” न्यायाधीश म्हणाले.“ नाही. खरं म्हणजे आरोपीला परब चा खून करायचं कारण होतं कारण तो तिचा पूर्वाश्रमीचा पती होता, तिला त्याच्या पासून सुटका हवी होती, तिच्या रिव्हॉल्व्हरनेच त्याचा खून झाला आहे