सावध - प्रकरण 23

  • 5k
  • 2.5k

प्रकरण २३दुपारी दोनच्या जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा ज्या वेळेला कोर्टाचे कामकाज सुरू झालं तेव्हा अॅडव्होकेट खांडेकर उठून उभे राहिले . त्यांचे चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती."युवर ओनर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे माझं असं मत झालं आहे की ज्या रिव्हॉल्व्हर ने खून झाला आहे त्याचा संबंध ठशाच्या दृष्टीने या खटल्यातले वकील पाणिनी पटवर्धन यांच्याशी जोडला जाऊ शकतो आणि कुणाच्या वेळेचा विचार केला तर त्या वेळेला पाणीनी पटवर्धन हे आरोपीच्या बरोबर गॅरेजमध्ये असल्यामुळे आरोपीचा देखील संबंध या रिव्हॉल्व्हरशी जोडला जाऊ शकतो. पाणिनी पटवर्धन यांना ओळखणारा जो साक्षीदार आम्ही आणला होता त्याला पाणिनी पटवर्धन यांनी काहीतरी मखलाशी करून ओळख पटवून अशक्य करून