जुळून येतील रेशीमगाठी - 3

  • 9k
  • 5.2k

भाग - ३.....अर्जुन - असं झालं तर...पेडणेकरांची बहीण साची आणि आपला अप्पू एकाच कॉलेज मधले निघाले...आम्हाला ही आजच समजलं....भागीरथी - अरे वाह बरच आहे की मग ओळखीचं ओळखी निघाल्या..... भाऊसाहेब - हो ना आणि तस आपल्या अप्पूच्या काय मैत्रिणीचं फार आहेत...म्हणून जगातल्या पन्नास टक्के मुली या त्याला ओळखतच असणार...संगीता - काय ओ बाबा माझा अपूर्व गुणांचा आहे हो.. अपूर्व - हा आई आता तू पण माझी मज्जा घेतेस मला कळत नाही कां अर्जुन - मग अप्पू बेटा आज तावडीत सापडला आहेस रोज आमची मज्जा घेतोस..आज तुझी.. अपूर्व - जातो मग मी.... संगीता - अरे अरे....अर्जुन - अग जाऊदे आई..गेला असेल