हरिश्चंद्रगडावर - भाग 3

  • 5.6k
  • 2.7k

गडावरील मंदिरांचा समूह प्राचीन आणि पाहण्यासारखा आहे. आदिदैवत हरिश्चंद्रेश्वराचे अतिशय देखणे हेमाडपंथी मंदिर असून आजूबाजूला इतर देवीदेवतांची दगडी बांधकाम असलेली मंदिरे आहेत. मंदिर परिसरात भली मोठी पुष्करणी आहे. आवारात एक गणेशमंदिर असून आतील गणेशमूर्ती अतिशय भव्य व देखणी आहे या मंदिर समूहातील प्रमुख आकर्षण असलेलं केदारेश्वर मंदिर मुख्य मंदिरापासून थोड खाली उतरून गेल्यावर आहे.आता मी प्रमुख आकर्षण म्हणतेय म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल या मंदिराचे काहीतरी खास वैशिष्टय असले पाहिजे.अगदी बरोबर ओळखलं तुम्ही सर्वांनी. शिवाची अवाढव्य दगडी पिंड ( कमीत कमी दोन पुरुष उंचीची) एका गुहेत चहू बाजूंनी पाण्याने वेढलेली आहे. पिंडीच्या चारही कोपऱ्यात चार दगडी खांब असावेत त्यातील