सावध - प्रकरण 18

  • 5.5k
  • 2.8k

सावध प्रकरण १८ दुसऱ्या दिवशी तारकर थेट पाणिनीच्या केबिन मधे घुसला आणि थेट विषयाला हात घातला.“ माझा साक्षीदार रुद्रांश गडकरी ने तुला ओळखलं तुला माहिती असेलच. ”“ खरचं की काय?” पाणिनी ने विचारलं.“ काल रात्री त्याने तुला उभं राहिलेलं आणि चालताना पाहिलं आणि ओळखलं.”“ कुणी सांगितलं तुला हे?”“ होळकर म्हणाला मला.” –तारकर उत्तरला.“ मी काल रात्री कुठे होतो हे त्याला कसं समजलं?”“ जनसत्ता मधे तू पत्रकारांना मुलाखत देताना आणि दारात उभा असतांना चे फोटो आलेत पाणिनी. होळकर ने सांगितलेल्या हकीगतीत एक खटकणारी गोष्ट आहे की तिथे फक्त फोटोग्राफर होते,वार्ताहार नव्हते.आणि ही बातमी फक्त जनसत्ता मध्ये आल्ये. इतर पेपरात का नाही