देवराई

  • 18.5k
  • 5.4k

देवराई कथासंग्रहलेखिका माधवी देसाईआज माधवी देसाईंच्या देवराई कथासंग्रहातली देवराई ही गोष्ट सांगते. तिचं नाव विसरले. आपण कुंदा ठेवुया. गोव्यातील एका गावात डोंगराच्या पायथ्याशी देवीचं देऊळ होतं. बाकी गोव्यातले लोक देवीचे उपासक असतात हे कोकणी ग्रुपवरील त्यांचे देवीचे सजवलेले फोटो पाहून प्रत्यय येतो. देवीला झुल्यावर बसवतात. जाईजुईच्या फुलांनी श्रुंगारतात. लईराई मातेचा तर केवढा उत्सव. अस्सल मत्स्यप्रेमी असणारेही जत्रेआधी महिनाभर मासमच्छी सोडतात..तसंच अंगाऱ्यावरुन चालत जातात. विषय भरकटला. देवळातले पुजारी आज ओरडत होते,"कुंदे किती गो उशीर? चौक पुसायचा आहे. देवाची पळी,पंचपात्र..घासायची आहेत. असंच केलंस तर मी कमिटीस तक्रार करेन. कुंदा जवळपास साठी उलटलेली. आज तिला उशीर झाला कारण तिच्या दोन नाती आल्या होत्या