छोट्यांच्या गोष्टी

  • 26k
  • 2
  • 9.5k

छोट्यांच्या गोष्टी श्रीगणेशा दिनकरला आईने गेल्यावर्षीचंच जुनं दप्तर स्वच्छ धुवून,वाळवून दिलं. त्यात पुस्तकंही जुनीच कोणाचीतरी मागून आणलेली. शेजारी रहाणाऱ्या मानवला त्याच्या बाबांनी आकर्षक दप्तर आणलं होतं. रेनकोटही नवीनकोरा, नवीन डबा, सगळंकसं नवकोरं करकरीत. दिनू आईला म्हणाला,"सगळं जुनं जुनं दिलयस मला, शाळेत न्हेण्यासाठी. मानवचं बघ सगळं कसं नवीन. मलाही तसंच नवीन दप्तर, नवीन पुस्तकं हवी. नाहीतर मी नाही शाळेत जाणार." आईने समजावून पाहिलं,ओरडून पाहिलं तरी दिनू ऐकेना तसं आईने त्याच्या बकोटीला धरलन नं मोरीत रेटत न्हेलं. दोन तांबे पाणी त्याच्या अंगावर ओतून, अंग कपडे धुवायच्या साबुवडीनेच खसाखसा चोळलं तसं दिनू परत डोळे चोळत रडू लागला. "बघ, हा साबणही असलाच वापरतेस. अंग