सावध - प्रकरण 16

  • 5.5k
  • 3k

सावध प्रकरण १६दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पाणिनी आपल्या टेबलवर वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचत होता.‘ वकिलाच्या हाताचे ठसे खुनी हत्यारावर सापडले.खुलासा करण्यास वकिलाचा नकार. स्त्री अशिलाला पोलिसांनी खुनाच्या आरोपात पकडले. वकिलाने किल्ली वापरून अशिलाच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्याचे निष्पन्न.’“ सर तुम्ही तारकरला त्या पत्राची आणि किल्लीची माहिती द्यायला नको होती.” सौम्या म्हणाली.“ तो एकमेव मार्ग होतं माझ्याकडे, मायरा ला सांगण्याचा,की मला तिला काय टिप द्यायची होती ते.” पाणिनी म्हणाला“ मला नाही समजलं.” –सौम्या.“ समज मायरा ने नाही तर वेगळ्याच कोणीतरी ती दोन्ही पत्रे लिहिली असतील आणि किल्ली पाठवली असेल तर? मायरा ने पाठवली असेल किल्ली तर मी तिच्या परवानगीनेच अपार्टमेंटमध्ये शिरलो