सावध - प्रकरण 15

  • 5.1k
  • 3k

सावध प्रकरण १५“हो नक्की लगेच करूया पोलिसांना सहकार्य करायला मी तयारच असतो. पण हेही लक्षात ठेव तारकर की माझ्या अशिलाचा माझ्यावर जो विश्वास आहे त्याला मी तडा जाऊन देऊ शकत नाही”तारकर ने त्याच्या हाताखालच्या पोलिसाला खूण केली हाताचे ठसे घेण्याचं एक उपकरण त्यांने आपल्या बॅगेतून बाहेर काढलं “उठून उभा रहा” तारकर म्हणाला“ओह नो. मी बसूनच करतो हा प्रकार.” पाणिनी हसून म्हणाला आणि त्याने आपला हात त्या पोलिसाच्या पुढे केला.हा सगळा प्रकार गडकरी बघत होता तो अचानक उद्गारला, “मला नाही वाटत मी बघितलेला माणूस हा आहे. मी जो माणूस बघितला होता तो खूपच जाड होता आणि..,.”“जरा गप्प बस आणि थोडा वेळ