सावध - प्रकरण 12

  • 5.6k
  • 3.4k

सावध प्रकरण १२दुसऱ्या दिवशी पाणिनी आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा कनक ओजस त्याची वाट बघत थांबला होता. “पाणिनी, तू मला जयद्रथ परब याची माहिती काढायला सांगितली होतीस.” कनक म्हणाला“हो बरोबर आज सकाळचे वर्तमानपत्र मी बघितलं त्यानं मायरा कपाडिया च्या गॅरेजमध्ये आत्महत्या केल्याचं दिसतंय.”“पेपरामध्ये तसं आलंय पाणिनी, प्रत्यक्षात बऱ्याच विचित्र घटना घडलेत पोलिसांना मायरा कपाडिया कडून माहिती मिळाली आहे ती एकदम सैरभैर झाली होती रात्री गाडी आत ठेवण्यासाठी त्यांनी गॅरेजचा दरवाजा उघडला आणि तिला आत मध्ये प्रेत पडलेले दिसले तिच्याबरोबर एक कोणतरी मैत्रीण होती. ती तिच्या घरी राहायला आली होती हे दृश्य बघितल्यावर त्यांनी गाडी तिथेच चालू ठेवली आणि घरात जाऊन पहिल्यांदा