सावध - प्रकरण 11

  • 6.3k
  • 3.3k

सावध प्रकरण ११पाणिनीने आपली गाडी मुख्य रस्त्याला आणून वाहतुकीमध्ये आणेपर्यंत सौम्या त्याच्याशी काही बोलली नाही.“आता सांगाल का सर काय झालंय?”“ती हरामखोर सैतानाची अवलाद!”“म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे तिने पोलिसांना कळवलं नाही?”“तिनं नाही कळवलं पोलिसांना. मी मगाशी बघितल त्याच अवस्थेत ते प्रेत अजूनही गॅरेजच्या फरशीवर पडलेल आहे. मगाचच्या आणि आताच्या स्थितीत फरक एवढाच आहे त्या प्रेताच्या उजव्या हाताजवळ एक रिव्हॉल्हर ठेवण्यात आलय”“म्हणजे सर आत्महत्या भासवण्यासाठी का?”“हो. आत्महत्या भासवण्यासाठी”“सौम्या, मी थोडा वेळ गाडी बाजूला लावून थोडा विचार करणारे” पाणिनी म्हणाला“आपण झालेला हा सगळा प्रसंग विसरून जाऊ शकणार नाही का सर?”“मला त्याही गोष्टीचा विचार करू दे. हे बघ इथे जरा गाडी लावायला जागा आहे,