सावध - प्रकरण 10

  • 5.7k
  • 1
  • 3.2k

सावध प्रकरण १० पियुष चा निरोप घेऊन पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा सौम्या काम करत होती “पोलिसांकडून काही कळलं का सौम्या म्हणजे त्यांचा फोन आला होता का ?किंवा ते येऊन गेले का?” “काहीही नाही. त्यांच्याकडून काहीच नाही” पाणिनीच्या कपाळाला आठ्या पडल्या “हे मला समजत नाहीसे झाले की अजून पर्यंत पोलीस आपल्यापर्यंत कसे पोहोचले नाहीत. खरं म्हणजे तास दोन तासापूर्वीच ते इकडे यायला हवे होते.” “सर, तुम्हालाही त्यांच्याकडून फोन वगैरे काही आला नाही?” “नाही ना मी पियुष ला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो” “पियुष ची तब्येत कशी आहे आता?” “ठीक आहे सुधारतोय तो त्याची तब्येत सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रसंग घडला आहे”