सावध - प्रकरण 5

  • 6.2k
  • 3.6k

प्रकरण ५आपल्या केबिन मधे जाण्यापूर्वी पाणिनी कनक ओजस च्या ऑफिसात आला.त्याचं ऑफिस ही त्याच मजल्यावर होतं.सौम्या,पाणिनी, तारकर, आणि कनक हे वर्गमित्र होते.अगदी खास,घट्ट मित्र.पुढे तारकर पोलिसात भरती झाला, आपल्या हुशारीने मोठया पदावर पोचला.कनक ओजस ने स्वतःची गुप्तहेर संस्था काढली.पाणिनी ने प्रथम पासून वकीली करायची असेच ठरवले होते त्याप्रमाणे तो शहरातला एक नावाजलेला वकील झाला. दोघांनी एकाच इमारतीत आणि एकाच मजल्यावर ऑफिस घेतलं.सौम्या ला पाणिनी ने आपल्याच व्यवसायात स्वतः ची सेक्रेटरी म्हणून सामावून घेतलं. पाणिनी आपली तपास काढायची कामे कनक ला द्यायचा. हे चौघेही घनिष्ट मित्र असूनही मैत्री आणि कर्तव्य यात वितुष्ट येऊ देत नसत.“ तुला मोठाच जॅकपॉट लागला पाणिनी.” कनक