सावध - प्रकरण 2

  • 7.7k
  • 4.8k

प्रकरण २ऑफिस मधून निघाल्यापासून बरोब्बर अर्ध्या तासाने पाणिनी ने मायरा कपाडिया च्या दाराची बेल वाजवली होती. वाजवण्यापूर्वी त्याचा नंबर २०८ असल्याची खात्री केली.दोन तीन वेळा बेल वाजवूनही ना आतून कसला आवाज आला ना कोणी दार उघडायला आलं. पाणिनी ने सहजपणे आपल्या खिशातून किल्ली काढली आणि बोटात धरून लॅच मधे घालून फिरवली. दार सहजपणे आवाज न करता उघडलं गेलं. आत हॉल मधे अंधार होता.पलीकडची बेडरूम लाईट लावल्यामुळे दिसतं होती. बेड नीट लावलेला नव्हता.त्यावर एक गाऊन अस्ताव्यस्त फेकलेला दिसतं होता आणि बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. पाणिनी ने पुन्हा दार ओढून घेऊन लावले मिनिटभर वाट पाहून पुन्हा बेल वाजवली.“ कोण आहे?”