चंपा - भाग 2

  • 12.9k
  • 9.4k

मला वाटले ती निघेल, पण ती जरा वेळ ऑफिस निरखून पाहत होती. पंधरा वीस मिनिट झाले असतील तरी फाइल्स, बुकशेल्फ, टेबल अगदी बारकाईने पाहत होती. माझा एक टेबल आणि दोन खुर्च्या सध्यातरी इतकचं होत. मी तिच्या टेबलचा विचार करत मोबाईल उचलला आणि एक टेबल आणि खुर्चीची ऑर्डर दिली. तिचे माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. मी फोन ठेवला तशी ती ताडकन उठली आणि म्हणाली."येवू सर..."मला लाजल्यासारखे झाले. इतका वेळ बसून तिला पाणी देखील विचारले नाही."नाही थांबा चहा, कॉफी सांगतो.""नाही नको... येते मी ."चालेल… अस म्हणायचे होते पण मी काहीच बोललो नाही.चंपा गेली. नाव अगदीच जुनं वाटत होत. " 'चंपा' तिच्या आईवडिलांना