रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 76

  • 2.8k
  • 1
  • 792

अध्याय 76 श्रीरामांचे शरयू नदीवर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विसृज्य लक्ष्मणं रामस्तीव्रशोकसमन्वितः ।वसिष्ठं मंत्रिणं चैव नैगमांश्चेदमब्रवीत् ॥१॥अद्य राज्येऽभिषेक्ष्यामि भरतं भ्रातृवत्सलम् ।अयोध्यायाः पतिं वीरं ततो यास्याम्यहं वनम् ॥२॥ लक्ष्मणाविषयी रामांचा शोकावेग : लक्ष्मणें सांडोनि इहलोक । पाताळ सेविता झाला देख ।तें देखोनि रघुनायक । शोकार्णवीं बुडाला ॥१॥श्रीराम म्हणे लक्ष्मणा । मज सांडोनि गेलासी गुणनिधाना ।काय अपराध देखोनी मना । माजी निष्ठुर झालासी ॥२॥लक्ष्मणा काय मी चुकलों । कोण अपराध आचरलों ।किंवा निष्ठुर बोलिलों । म्हणोनि रुसलासी सौ‍मित्रा ॥३॥मजबरोबरी वनांतरीं । हिंडतां श्रमलासी बा भारी ।द्वादश वर्षे निराहारी । अन्न उदक त्यजियेलें ॥४॥म्हणोनि कोपलासी वेल्हाळा । सुमित्रेच्या लघु बाळा ।आतां मुख