रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 75

  • 2.8k
  • 801

अध्याय 75 लक्ष्मणाचे पाताललोकी गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निजपुत्रांसि स्थापोनि सिंधुप्रदेशीं । भरत निघाला श्रीरामभेटीसी ।येवोनियां अयोध्येसी । अग्रजासी वंदिलें ॥१॥सांगितला सविस्तर वृत्तांत । एइकोनि संतोषला श्रीरघुनाथ ।चंद्रा देखोनि उचंबळत । क्षीरार्णव जैसा हा ॥२॥उदित होतां दिनकर । कुमुदिनी उल्हासे थोर ।भरत भेटलिया श्रीरघुवीर । आनंदातें पावला ॥३॥अरुणानुजें अमरावतिये । अमृतहरणीं पावला जय ।तेणें वंदिली विनता माय । तैसा भरत भेटला ॥४॥याउपरी काय वर्तलें । तें श्रोतीं पाहिजे परिसिलें ।तेंचि आतां वक्तियां वहिलें । सांगों आदरिलें श्रीरामकथे ॥५॥ उभौ कुमारौ सौमित्रे तव धर्मविशारदौ ।अंगदश्चंद्रकेतुश्च समर्थौ दृढध्न्विनौ ॥१॥इमौ राज्येऽभिषेक्ष्यामि देशः साधु विधीयताम् ।रमणीयो ह्यसंबाधो रमेतां यत्र धन्विनौ ॥२॥न राज्ञां यत्र