रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 74

  • 2.9k
  • 810

अध्याय 74 भरताकडूण गंधर्वाचा पराजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आकाशवाणीचें उत्तर । ऐकोनियां श्रीरघुवीर ।करी धरोनियां कुमर । यज्ञशाळॆ प्रवेशला ॥१॥क्रमोनियां तेथे शर्वरी । प्रातःकाळीं दूषणारी ।स्नानसंध्या करोनि ते अव्सारी । ऋषींसहित बैसला ॥२॥सभामंडळीं थोर थोर । मिळाले राक्षस वानर ।प्रधान सेनानायक ऋषिष्वर । नगरींचें नागरिक लोक ॥३॥आज्ञा देवोनि लहुकुशांतें । श्रीरामें आरंभिलें रामकथेंतें ।ऐकतां सुख व वाटे चित्तें । परम व्याकुळ पैं झाला ॥४॥पाहूं लागला चहूंकडे । न देखे जानकीचें रूपडें ।म्हणे दिशा दृष्टी उद्वस पडे । अंधकार दाटूनी ॥५॥माझिये जानकीवीण । उद्वस अवघे विरंचिभुवन ।मज राज्याची चाड कोण । सभा विसर्जून ऊठिला ॥६॥नावडे राज्यभोगोपचार । नावडे छत्रचामर ।नावडे