रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 73

  • 2.8k
  • 792

अध्याय 73 सीतेचे पाताळात आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वानरसेनेसीं श्रीरघुनाथ । विजयी झाला आनंदभरित ।अयोध्ये येवोनि कार्यार्थ । पुढें काय वर्तला ॥१॥मारोनियां कुंभकर्णपुत्र । विजयी झाला श्रीराम जानकीसहित ।ऐसें ऐकोनि महंत । थोर थोर येते झाले ॥२॥आले विबुध सुधापानी । आला अगस्ति ज्याची जननी ।उर्वशी नामें प्रसिद्ध ॥३॥ऐसिये शरयूतीरपुराभीतरी । सभासदनीं पौलस्त्यारी ।बंधुपुत्रवेष्टित ऋषीश्वरीं । बैसजेल निजस्थानीं ॥४॥कौसल्यादि माता जाण । पूरवासी नागरिक प्रधान ।श्रीगुरू वसिष्ठ पावन । यांहीं विराजमान शोभत ॥५॥जेंवी इंदुमंडळा पुढें मागें । परिवेष्टित तारागणें अनेगें ।तैसें समस्तांसहित श्रीरंगें । सभासदानीं शोभिजे ॥६॥जेंवी मानससरोवरीं । पक्षिये मुक्ताफळाहारी ।जेंवी सुधापानियांमाजी शैलारी । तैसा राजेश्वरीं शोभे श्रीराम ॥७॥कुळाचळामध्ये