रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70

  • 3.1k
  • 904

अध्याय 70 कैकेयीला लंकादर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।राज्य करितां स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं नाहीं ॥१॥देशींचे लोक पुण्यशील । स्वधर्मीं रत द्विज सकळ ।अग्निहोत्रें करोनियां काळ । श्रीरामनामीं कंठिती ॥२॥घरोघरीं तुळसीवृंदावनें । नित्य करिती हरिकीर्तनें ।ठायीं ठायीं होती पुराणें । शास्त्रव्याख्यानें घरोघरीं ॥३॥आणिक जे इतर लोक । तेही नगरीं स्वधर्मरक्षक ।भूतदयासुत दीनपाळक । उपकारीं अत्यंत पुढिलांसी ॥४॥भरतशत्रुघ्न कैकेयीनंदन । सुमित्रेचा लक्ष्मण ।श्रीरामसेवे अनुदिन आसक्त । जाण मन त्यांचें ॥५॥प्रधानवर्ग सकळिक । नगरींचे नगरलोक ।बंदिजन सर्व सेवक । श्रीराम‍उपासक अनुदिनीं ॥६॥अष्टदळकमळकळिकेमाझारीं । जनकीसमवेत कनकमृगारी ।नीळवर्ण छत्र शोभे शिरीं । बंधु परिवारी उभे तेथें ॥७॥ऐसा सुंदर राजीवलोचन