रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 69

  • 2.9k
  • 933

अध्याय 69 श्रीरामांना जानकी व पुत्रांची भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणारिपुत्रीं दोघीं जणी । नर वानर समरांगणीं ।जीत बांधिलें कित्येक मेदिनीं । गतप्राण होवोनि ठेलें ॥१॥अश्व गज वना आले । तेही गतप्राण होवोनि ठेले ।किंचित घायाळ उरले । ते प्रवेशले अयोध्यापुरीं ॥२॥भद्रासनीं जनकजामात । जैसा नभीं शोभे भास्वत ।भोंवते ऋषी परम ज्ञानवंत । सुमंतादिक प्रधान ॥३॥बैसले सभानायक । नगरपंडित पुराणिक ।चहूं वेदांचे वेदपाठक । ज्योतिषी गायक गंधर्व ॥४॥ऐसी सभा प्रसन्नवदन । एक करिती गायन ।एक करिती शास्त्रव्याख्यान । एक जन रंजविती ॥५॥ घायाळ सैनिकांनी त्या कुमारांविषयी श्रीरामांन निवेदन केले : येरीकडे रणींचे वीर । अशुद्धें डवरिलें जैसे गिरिवर ।येवोनि