रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 65

  • 3.1k
  • 900

अध्याय 65 अश्वमेध यज्ञ व लवकुशांचे गायन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे लक्ष्मणभरतांसी । कर्दमपुत्रकथा ऐसी ।पुढें वर्तले तें सावकाशीं । अवधानेंसी अवधारा ॥१॥ऐलाबुधांपासून । पुरुरवा पुत्र झाला जनन ।तदनंतर बुध सज्ञान । काय करिता पैं झाला ॥२॥पाचोरोनि सर्व मुनी । च्यवन भृगु तपोधनी ।पुलस्त्यादि श्रेष्ठ ब्राह्मणीं । ॐकार वषट्कार पैं आले ॥३॥सोमसुत म्हणे ऋषींसी । परिसा कर्दमऋषीच्या पुत्रकथेसी ।ऐलनामें स्वधर्मेसीं । राज्य करित पराक्रमें ॥४॥तो आला या वना पारधीसी । सैन्येसहित महादेवें शाप त्यासी ।दिधला असतां त्याच्या हितासी । तुम्ही समस्तीं विचारा ॥५॥ऐकोनि सोमसुताचें वचन । ऋषीश्वरां संतोष अति गहन ।समस्त एकवट मिळोन । बोलावया उपक्रम करिते झाले