रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 63

  • 3.1k
  • 1.1k

अध्याय 63 वृत्रासुरवधाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऋषीची संज्ञा जाणोन । श्रीरामें स्नानसंध्या सारुन ।नंतर करावया भोजन । ऋषि राम प्रवर्तले ॥१॥श्रीरामभोजनाकारणें । नानापरींचीं फळें तेणें ।उत्तम शाका अगस्तीनें । श्रीरामालागीं आणिल्या ॥२॥उत्तम फळें रुचकर । भोजनीं प्रवर्तला राजेश्वर ।भोजन करोनि श्रीरघुवीर । निजासनीं बैसला ॥३॥तृणपर्णकुटिकेमाझारी । श्रीरामें निद्रा करोनि तमारी ।उदय होतां नृपकेसरी । स्नानसंध्या संपादिली ॥४॥ऋषींस करोनि नमस्कार । हात जोडोनि श्रीरघुवीर ।म्हणता झाला आजि भाग्य अपार । चरण तुमचे देखिले ॥५॥आजि धन्य माझें कुळ । धन्य माझें भाग्य सफळ ।जन्मोजन्मींचें तपाचें फळ । चरणयुगुल देखिलें ॥६॥आतां निजनगरा जावयासी । आज्ञा दिधली पाहिजे ऋषी ।ऐसें श्रीराममधुरवचनासी ।