रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 60

  • 3k
  • 993

अध्याय 60 लवणासुराचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शत्रुघ्न-लवणासुराचे द्वंद्वयुद्ध : दाशरथि युद्धा प्रवर्तला । हें देखोनि लवण क्रोधें उंचबळला ।दंतदाढा रगडूं लागला । हात चुरी कटकटा करुनी ॥१॥लवणासुर म्हणे शत्रुघ्नासी । आतां मजपसोनि कोठे जासी ।कोणे मायेचे पोटीं रिघसी । केउता पळसी मंदबुद्धि ॥२॥द्विजारीचें ऐकोनि वचन । मग तो दाशरथ वीर दारुण ।काय करिता झाला आपण । शत्रुघ्न लक्षोनि ते काळीं ॥३॥माझ्या भुजांचा पराक्रम गहन । आणि वज्रासारिखा बाण ।घायें तुझा घेईन प्राण । तंव राक्षसें ताळ घेतला ॥४॥तो टाकिला शत्रुघ्नावरी । ताळ येतां देखोनि अंबरीं ।दाशरथी वीर धनुर्धारी । बाणें शतखंड वृक्ष केला ॥५॥सवेंचि दुसरा पादप घेतला ।