रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 59

  • 3k
  • 981

अध्याय 59 शत्रुघ्नाचा लवणपुरीत प्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिलें प्रसंगीं शत्रुघ्नासी । अभिषेकोनि मधुपुरीसीं ।पाठवितसे लवणासुरासी । वधावयाकरणें ॥१॥ शत्रुघ्नाला युद्धनीतीची शिकवण : श्रीराम म्हणे शत्रुघ्ना । सवें घेईं असंख्य धना ।धान्याचा संग्रह करोनि जाणा । मार्गक्रमण करावी ॥२॥अश्व उत्तम अनेक । सर्वे घेईं असंख्य ।रथ कुंजर सेना सेवक । नृत्यकारक तेही नेईं ॥३॥जे मार्गीं चालतां श्रमलियासी । गीत विनोद करिती संतोषीं ।आप्तवर्गसेवकांसीं । धन बहुत पैं द्यावें ॥४॥मार्गीं वैरियासी कळों न द्यावें । हळू हळू सैन्य पाठवावें ।आपण स्थिर होवोनि जावें । उत्तम मार्ग पाहोनी ॥५॥एकाएकीं मधुपुरीस जाण । धाडी घालोनि आपण ।करीं लवणासुराचें निर्दळण । अन्यहस्तें मरण