रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 38

  • 3k
  • 1.1k

अध्याय 38 बिभीषणाला लंकाप्रदान व राज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीच्या वचनाने श्रीरामांचा संतोष : बिभीषणाचा वृत्तांत । समूळ सांगे हनुमंत ।तेणें तुष्टला श्रीरघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥ १ ॥ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला रघुनंदन ।सुग्रीवादि वानरगण । त्यांप्रति आपण धर्म सांगे ॥ २ ॥सद्भावेंसीं संपूर्ण । अथवा कपटें आलिया शरण ।त्यासीं नाहीं सर्वथा मरण । सत्य भाषण हें माझें ॥ ३ ॥ शरणागताला केव्हांही अभयच, रावण जरी आला तरीही त्याला अभय मिळेल : माझा करावया घात । शरण आलिया लंकानाथ ।त्यासीही माझा अभयहस्त । जाणा निश्चित कपि सर्व ॥ ४ ॥शरणागतापासाव मरण । आम्हांसी सर्वथा नाहीं जाण ।हेंही माझें